Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मान्यता नसलेल्या १७ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई

मान्यता नसलेल्या १७ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची कारवाई

सामना 1 week ago

त्तराखंडमधील नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या यादीतून १७ मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नावे वगळण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उत्तराखंडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, २०१९ नंतर झालेल्या कोणत्याही लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत सहभागी न झालेल्या तसेच प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान ज्यांच्या कार्यालयांचे पत्ते शोधूनही सापडले नाहीत, अशा पक्षांचा या यादीत समावेश आहे.

या पक्षांमध्ये भारत कौमी दल (हरिद्वार), भारत परिवार पार्टी (हरिद्वार), भारतीय सम्राट सुभाष सेना (हरिद्वार), पीपल्स पार्टी (हरिद्वार), भारतीय मूल निवासी समाज पार्टी (डेहराडून), भारतीय अंत्योदय पार्टी (डेहराडून), भारतीय ग्राम नगर विकास पार्टी (डेहराडून), गोरखा डेमोक्रॅटिक फ्रंट (डेहराडून), प्रजातंत्र पार्टी ऑफ इंडिया (नैनीताल), सूरज सेवा दल (हल्द्वानी) आणि उत्तराखंड जनशक्ती पार्टी (डेहराडून) यांचा समावेश आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

यापूर्वीही निवडणूक आयोगाने भारतीय जनक्रांती पार्टी (डेहराडून), भारतीय जनमंच पार्टी (डेहराडून), मैदानी क्रांती दल (डेहराडून), प्रजामंडल पार्टी (पौरी गढवाल), राष्ट्रीय ग्राम विकास पार्टी (हरिद्वार) आणि राष्ट्रीय जनसहाय दल (डेहराडून) या आणखी सहा पक्षांची नोंदणी रद्द केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana