Dailyhunt
मराठी शाळांच्या जागांवर राजकारण्यांचा डोळा; राज ठाकरे यांचा आरोप

मराठी शाळांच्या जागांवर राजकारण्यांचा डोळा; राज ठाकरे यांचा आरोप

सामना 2 weeks ago

'महाराष्ट्रातील राजकारणी मराठी शाळा विकायला लागले आहेत. या शाळांच्या मोक्याच्या जागांवर त्यांचे लक्ष आहे. पत्रकारांनी राजकीय दबावाला बळी न पडता या विषयांना वाचा पह्डली पाहिजे,' असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.

स्व. वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्काराचे वितरण राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात झाले. कमलेश सुतार, मृणालिनी नानीवडेकर, दीपक कांबळे, मीनाक्षी गुरव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पत्रकारितेसह राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केले. 'मुंबई, पुण्यात सगळ्या जागा ओरबाडून खाल्ल्या जात आहेत. सरकारी जागांवर अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत. ती फक्त सरकारी जागांवरच दिसतात. कोणत्याही नगरसेवक किंवा आमदाराला आपलेपणाची भावना राहिलेली नाही. हावरटपणा आणि बजबजपुरी सुरू आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

भय्ये मराठी पुरस्कार घेताना दिसतील

सध्या भय्यांना मराठी शिकवायचे चालले आहे. भय्यांना मराठी शिकवले तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भय्ये दिसतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana