Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'मरे'वर एसी लोकलच्या तांत्रिक बिघाडाने गोंधळ

'मरे'वर एसी लोकलच्या तांत्रिक बिघाडाने गोंधळ

सामना 1 week ago

ध्य रेल्वे मार्गावर सामान्य लोकलप्रमाणेच वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांचा गोंधळ सुरू झाला आहे. एका एसी लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाने मंगळवारी दिवसभरात सात एसी फेऱ्यांच्या नियमित प्रवाशांची गैरसोय झाली.

त्या सात फेऱ्या सामान्य लोकलच्या सहाय्याने चालवण्यात आल्या.

एसी ट्रेनचे मर्यादित रेक असल्यामुळे तांत्रिक बिघाडाच्या काळात हा गोंधळ निर्माण होत असल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. मध्य रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. सामान्य लोकल फेऱ्यांच्या जागी एसी फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे आधीच सामान्य प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana