Dailyhunt
म्हाडा आता घरे भाडय़ाने देणार; पोर्टल बनविण्यासाठी आठ कंपन्यांमध्ये स्पर्धा

म्हाडा आता घरे भाडय़ाने देणार; पोर्टल बनविण्यासाठी आठ कंपन्यांमध्ये स्पर्धा

सामना 1 week ago

र्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाडय़ाने घरे उपलब्ध करून देण्यासाठी नो ब्रोकर, मॅजिकब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडा स्वतःचे पोर्टल लाँच करणार आहे. पोर्टल तयार करण्यासाठी आठ कंपन्या इच्छुक असून पुढील आठवडय़ात त्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांपुढे प्रेझेंटेशन सादर करणार आहेत.

त्यातील एका कंपनीची निवड होऊन पोर्टल बनवण्याच्या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होईल.

केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाने म्हाडाला भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या घरांचे धोरण तयार करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र स्टेट रेंटल हाऊसिंग पोर्टल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाकडून नोव्हेंबर महिन्यात स्वारस्य निविदा काढण्यात आल्या होत्या. या पोर्टलमुळे नागरिकांना घर भाडय़ाने घेण्यासाठी किंवा देण्यासाठी आता दलालांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही. केवळ नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

नोकरी, शिक्षण किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर

आजारावरील उपचारासाठी अनेकांना मुंबई गाठावी लागते. परंतु पाच ते सहा महिने अशा छोटय़ा कालावधीसाठी रुम भाडय़ाने मिळणे मुश्कील होते. पोर्टलमुळे ही अडचण दूर होणार असून कमी कालावधीसाठी देखील घरे भाडय़ाने मिळू शकतील.

म्हाडाच्या या पोर्टलवर भाडेकरू व्यवस्थापन, देखभाल नोंदी, उपलब्ध घरांची माहिती, भाडेकरार, पोलीस व्हेरिफिकेशन, स्टॅम्प डय़ुटी व नोंदणी या प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. यामुळे भाडेतत्त्वावर घर घेणे अधिक सोपे, सुरक्षित आणि परवडणारे होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana