Thursday, 04 Mar, 9.45 am सामना

ठळक
म्हाडाच्या अभय योजनेला उत्तम प्रतिसाद;भाडेकरूंकडून तब्बल 3 कोटींची भाडेवसुली

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत येणाऱया संक्रमण शिबिरातील हजारो ग्राहकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अंतर्गत मुंबईतील तब्बल 21 हजार 149 संक्रमण शिबीर गाळय़ांमधील भाडेकरूंनी आतापर्यंत तब्बल 3 कोटी 84 लाख 79 हजार 404 रुपये थकीत भाडे भरले असल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.

कोरोना काळात अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे संक्रमण शिबिरातील अनेक भाडेकरूंना घरभाडे भरण्यास अनेक अडचणी येत होत्या. या भाडेकरूंना दिलासा देत म्हाडातर्फे अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून याबद्दल अधिक माहिती विनोद घोसाळकर म्हणाले की, पहिल्या टप्प्यांतर्गत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरणाऱया संक्रमण शिबीर गाळय़ांतील भाडेकरू/रहिवाशांना एकूण व्याजामध्ये 60 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

या योजनेला प्रतिसाद दिल्याबद्दल संक्रमण शिबिरातील भाडेकरूंचे आभारदेखील घोसाळकर यांनी यावेळी मांडले. तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, उपमुख्य अधिकारी (संक्रमण गाळे)तुषार राठोड, संबंधित मिळकत व्यवस्थापक, भाडेवसुलीकार यांचे कौतुक केले.

 • योजनेच्या दुसऱया टप्प्यांतर्गत संक्रमण शिबीर गाळय़ातील भाडेकरूंनी 31 मार्च, 2021 पर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये 40 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
 • मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबीर गाळय़ांमध्ये राहणाऱया भाडेकरू यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात भाडे व त्यावरील व्याजापोटी एकूण रु. 129.92 कोटी रक्कम थकीत आहे.
 • अ विभाग -रु. 11 लाख 56 हजार 359
 • ब 2 विभाग - रु. 1 लाख 81 हजार 907
 • सी 1 विभाग - रु. 8 लाख 75 हजार 382
 • सी 2/3 विभाग - रु. 8 लाख 99 हजार 53
 • डी 1 विभाग - रु. 2 कोटी 4 लाख 92 हजार 989
 • डी 2 विभाग - रु. 3 लाख 34 हजार 140
 • डी 3 विभाग - रु. 51 हजार 75
 • ई 1 विभाग - रु. 11 लाख 45 हजार 346
 • ई 2 विभाग - रु. 32 लाख 17 हजार 500
 • ग दक्षिण विभाग - रु. 27 लाख 89 हजार 958
 • ग उत्तर विभाग - रु. 11 लाख 07 हजार 412
 • फ उत्तर विभाग - रु. 18 लाख 87 हजार 319 आणि 22 लाख 51 हजार 564
 • फ दक्षिण विभाग - रु. 20 लाख 89 हजार 400

एकूण - रु. 3 कोटी 84 लाख 79 हजार 404

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top