महागाईचा भडका आणि पेट्रोलची दरवाढ यात सामान्य जनता होरपळून निघाली आहे. जगणे हराम झाल्याने ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. ठाणेकर असलेल्या संगम डोंगरे यांनीही बुधवारी उपोषणिक आंदोलन केले.
पेट्रोल भरण्यासाठी तीन पेट्रोल पंपावर गेलेल्या डोंगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'भाई और बहनो… पेट्रोल के दाम कम हुए की नही हुए… आपके जेब मे पैसा बचता है की नही बचता…' ही ऑडिओ क्लिप मोठ्याने लावली आणि नोटाऐवजी चिल्लर देत बाईकमध्ये पेट्रोल भरले.

