देशापुढे अनेक आव्हाने आ वासून उभी असताना निवडणूक प्रचारात दंग झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार संपताच पर्यटनात रमले आहेत. सिक्कीममध्ये मंगळवारी फुटबॉलला किक दिल्यानंतर बुधवारी त्यांनी थेट काशी विश्वनाथाचे मंदिर गाठले.
तिथे पूजा-अर्चा केली. त्यानंतर मंदिराच्या आवारातच त्रिशूळ-डमरू हाती घेऊन कॅमेऱ्यासमोर चक्क शंभू महादेवाची पोझ दिली. त्यांचा हा नवा फोटो सोशल मीडियात वाऱ्यासारखा पसरला आणि त्यावरून ते ट्रोल झाले. 'आज मतदानाचा दिवस आहे. ही निवडणुकीची जादू आहे… ज्या वेगाने तुम्ही मंदिरांना भेटी देता, त्याच वेगाने शाळा आणि रुग्णालयांना भेटी द्या. हिंदुस्थानचं भविष्य कुठं शिकतंय ते कळेल…' अशा प्रतिक्रियांचा 'अभिषेकच' नेटकऱ्यांनी केला.

