Wednesday, 02 Dec, 3.08 pm सामना

ठळक
मोठी बातमी - कोरोनाची 'उलटी गिनती'; ब्रिटनमध्ये 'Pfizer' ची लस देणार, आरोग्य विभागाची परवानगी

ब्रिटन पहिला असा पश्चिमेकडील देश आहे ज्याने कोविड-19 विरोधात काम करणाऱ्या एका लसीला परवानगी दिली आहे. Pfizer/BioNTech ची लस त्यांना देण्यात येईल ज्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक आहे, असे यावेळी सांगण्यात आले आहे.

लसीला मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी अथॉरिटी (MHRA) कडून परवानगी मिळाली आहे. MHRA च्या विशेष नियमांच्या नुसार 1 जानेवारीपासून लसीला मान्यता देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

ब्रिटेनने 4 कोटी डोस खरेदी केले

Pfizer ची लस शेवटच्या ट्रायलमध्ये 95% यशस्वी ठरली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. लसीचा पहला डोस पुढल्या काही दिवसांतच दिला जाईल. ब्रिटेनने 4 कोटी डोस खरेदी केले आहेत. कंपनीच्या चेअरमन अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितेल आहे की, 'आज ब्रिटेनमध्ये ही लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविडच्या विरोधातील लढाईत ऐतिहासिक क्षण आहे.'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top