Saturday, 25 Sep, 5.00 am सामना

ठळक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बैठक ओबीसी आरक्षणासाठीच

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण काही सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी झालेली बैठक ही ओबीसी आरक्षणासाठीच होती. यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. दरम्यान या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही केवळ ओबीसी आरक्षणासंदर्भात होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष देखील उपस्थित असल्याचे सांगितले. या भेटीमध्ये ओबीसी आरक्षण पुन्हा कसे देता येईल यावर चर्चा झाली. त्यासंदर्भात माझ्या काही सूचना होत्या त्या मी त्यांना केल्या आहेत. मला विश्वास आहे, जर त्या सूचनांचा अवलंब झाला तर सर्वेच्च न्यायालयात देखील आपली केस टिकेल व निश्चितपणे ओबीसी आरक्षण परत देता येईल, असे फडणवीस म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top