Tuesday, 11 Aug, 3.07 pm सामना

ठळक बातम्या
मुला मुलीने पळून जाऊन केले लग्न, मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून जबर मारहाण

पंढरपुरमध्ये मुला मुलीने पळून जाऊन लग्न केले. याचा राग मनात धरून मुलाच्या वडिलांना भर चौकात झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे. मंगळवेढा तालुक्‍यातील भाळवणी येथे ही घटना घडली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

मंगळवेढा येथील एका मुलीने तिच्या घराशेजारच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे. या घटनेची खंत त्या मुलीच्या संबंधित नातेवाईक व भावकीमध्ये होती. त्याचा राग मनात धरून मुलाच्या वडिलांना घरापासून तीन किलोमीटर अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकात लिंबाच्या झाडाला बांधून आणखी जबर मारहाण करण्यात आली.

घटनेची माहिती मिळाताच पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चार जणांना ताब्यात घेतले आहे. इतर सहभागी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top