Dailyhunt
Mumbai crime news - बनावट लिंक पाठवून बँक खात्यावर डल्ला

Mumbai crime news - बनावट लिंक पाठवून बँक खात्यावर डल्ला

सामना 1 week ago

गॅस बिलाचे पैसे बाकी असल्याचे भासवत बनावट लिंक पाठवून ठगाने वृद्ध व्यावसायिकाच्या बँक खात्यावर डल्ला मारला. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या आठवडय़ात त्याना गॅस कंपनीचा मेसेज आला होता . त्यात त्यांचे बारा रुपयांचे पेमेंट बाकी असल्याचे भासवले . ते बिल भरण्यास सांगून अपडेट करण्यास सांगितले . त्या मेसेजमध्ये एक लिंक होती . ती लिंक ओपन करून त्याने पैसे भरण्याचा प्रयत्न केला . या दरम्यान त्यांचे बँक अॅप्स हॅक झाले . ठगाने तक्रारदार यांच्यासह त्याच्या कुटुंबातील तिघांच्या बँक खात्यातून 19 लाख 74 हजार रुपये काढले . खात्यातून रक्कम गेल्याचे त्यांच्या लक्षात आले . त्यानंतर त्यांनी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली . पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana