Dailyhunt
Mumbai crime news - चोरीच्या सिलिंडरची करायचे विक्री; 45 सिलिंडर केले जप्त

Mumbai crime news - चोरीच्या सिलिंडरची करायचे विक्री; 45 सिलिंडर केले जप्त

सामना 1 week ago

ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई येथून चोरी केलेल्या गॅस सिलिंडरची विक्री करणाऱयाला पवई पोलिसांनी अटक केली. राज कांबळे असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 45 सिलिंडर आणि 3 मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत.

या गुह्यात राज ला मदत करणाऱया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले. दोन वर्षांपूर्वी पवई पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद होता. या गुह्याचा तपास पोलीस करत होते.

त्या चोरीच्या मोटररसायकलचा वापर करून काही जण ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथून गॅस सिलिंडर चोरी करत असल्याचे समोर आले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी राजला ताब्यात घेतले. राज हा ठाणे येथे राहत असून त्याने काही मोटारसायकलची चोरी केली होती. त्या चोरीच्या मोटारसायकलचा वापर गॅस सिलिंडरचा वापर करण्यासाठी करत होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana