Dailyhunt
Mumbai News - चर्चगेटमध्ये दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai News - चर्चगेटमध्ये दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

सामना 1 week ago

र्चगेट येथे दगडाने ठेचून एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पंजवानी उर्फ पंजाबी (55) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ओळखीच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वीर नरिमन रस्त्यावरील बस डेपोजवळ असलेल्या टाटा गार्डनमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांना मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक जनार्दन जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यक्तीला तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्राथमिक तपासादरम्यान, मृत व्यक्तीची ओळख राहुल पंजवानी ऊर्फ ‘पंजाबी’ अशी पटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडाने ठेचून राहुल यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana