मुंबईतील ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी फोनवरून मिळाली. मुंबई पोलिसांना तात्काळ या फोनबाबत माहिती देण्यात आली. यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांनी फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने मुंबईतील ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलमध्ये फोन करत दोन्ही ठिकाणी लवकरच दहशतवादी हल्ला होईल, असे सांगितले. मुंबई पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध घेतला. आरोपीला मुंबईतील सायन परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीने असे कृत्य का केले याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

