Sunday, 15 Sep, 8.59 am सामना

मुंबई
मुंबई,ठाण्यात मुसळधार पाऊस

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा कमबॅक केले असून शनिवारी रात्रीपासून मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गणेश चतुर्थीआधी पावसाने उसंत घेतली होती. पण बाप्पाचे आगमन झाल्यानंतर मात्र पावसाने मुंबई उपनगरांसह ठाण्याला अक्षरश झोडपून काढले. त्यामुळे भविकांना हा गणेश उत्सव पावसातच साजरा करावा लागला. पण गुरुवारी अनंत चतुर्थीनंतर पावसाने जरा उसंत घेतली. त्यामुळे मुंबईकरांना बऱ्याच दिवसांनी सूर्यदेवाचे दर्शन झाले. पण शनिवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून रविवारी सकाळी पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे.

ठाण्यात रात्रभर मुसळधार पाऊस असल्यामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच आज तीनही मार्गावर ब्लॉक असून पावसामुळे मध्य रेल्वे विलंबाने धावत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top