Saturday, 31 Aug, 7.54 am सामना

ठळक बातम्या
मुंबईत विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबईमध्ये मोठी धडक कारवाई केली असून यात विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जोगेश्वरी येथे दहा लाखांचा मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

उत्पादन शुल्क विभागाने सांताक्रुझ येथे जेठालाल नामक व्यक्तीला बनावट विदेशी मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करताना अटक केली. या व्यक्तीकडे एक लिटरच्या सहा ब्लॅक लेबल बनावट व्हिस्कीच्या बाटल्या आढळल्या. त्याने तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने कारकाई केल्यास जोगेश्वरी येथे मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त मद्याची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

जोगेश्वरी येथील मजासगाक टेकडी मध्ये कैलासपती चाळीत ही टोळी सक्रिय होती. या कारवाईत 77 x1000 मि.ली बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार बाटल्या, 37×750 मि.ली हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या सीलबंद बाटल्या, 10×2000 मि.ली हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या सीलबंद बाटल्या, देशी दारू, 336 x 1000 मि. ली विदेशी मद्य विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या. विविध विदेशी मद्य बाटल्यांची बनावट बुचे इतर साहित्यासह एकूण 10 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चिमुकल्या हातांनी साकारले बाप्पा
गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसपासून प्रदूषण कसे होते हे पटवून देण्यात येते. जवाहर बाल भवन येथे आयोजित गणेशमूर्ती कार्यशाळेत चिमुकल्या हातांनी शाडू मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारली.

उच्चभ्रू वस्तीत डय़ुटी फ्री म्हणून विक्री
ही टोळी उच्चभ्रू वस्तीत राहणाऱया लोकांच्या जिवाशी खेळत होती. उच्चभ्रू वस्तीतील लोकांना हे मद्य डय़ुटी फ्री म्हणून विकले जात होते. हिंदुस्थानी बनावटीचे कमी प्रतीचे मद्य विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरले जायचे. त्यावर बनावट बुचाच्या सहाय्याने सीलबंद केल्या जायच्या. उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांना डय़ुटी फ्री शॉपचे मद्य असल्याचे सांगून अधिकृत दुकानांच्या किमतीपेक्षा कमी किमतीत विक्री केली जायची. या गुह्यातील मूळ सूत्रधार व त्यास बनावट बुचांचा पुरवठा करणारा इसम हे दोघे फरार आहेत. अशा प्रकारे बनावट भेसळयुक्त मद्य शरीरास हानीकारक असून नागरिकांना शासनाच्या अधिकृत दुकानामधून मद्य खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top