मुंबईतील स्मशानभूमी लवकरच प्रदूषणमुक्त होणार आहेत. मुंबई शहरातील स्मशानभूमींमधील वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने कार्बनमुक्त शवदाहगृह वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेने या प्रक्रियेला सुरुवात केली असून लवकरच स्मशानभूमीमध्ये कार्बनमुक्त दाहिनी पाहायला मिळणार आहे.
अंत्यसंस्कार करताना शवदाहिणीत मोठय़ा प्रमाणात धूर होतो व वायुप्रदूषण होते. हा धूर, राखेचे सूक्ष्म कण आणि इतर प्रदूषित घटक कमी करण्यासाठी सीएपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. ही आधुनिक प्रणाली प्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार असून सीएपीएसच्या माध्यमातून उत्सर्जित होणाऱ्या धुराचे शुद्धीकरण करून प्रदूषण कमी करण्याचा मदत होणार आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे स्मशानभूमी परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.
मुंबईशहरउपनगरातीलस्मशानभूमी
धर्मपालिकेच्या कितीखासगी कितीएकूण
हिंदू 48 22 70
मुस्लिम 17 57 74
ख्रिश्चन 10 42 52
इतर 0 5 05
एकूण 75 126 201
पर्यावरणपूरकउपक्रम
पारंपरिक लाकडावर आधारित दहन प्रणालीऐवजी 17 गॅसवर आधारित व 6 विद्युत स्मशानभूमी सध्या कार्यरत आहेत.

