Saturday, 28 Mar, 5.22 pm सामना

ठळक बातम्या
नगरमध्ये भाजीपाल्याची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रम सुरू

आज संगमनेर येथे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, महसूल विभाग व नगरपालीका संगमनेर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित, विरगाव ता अकोले येथील कृषि संजीवनी डाळिंब व भाजीपाला उत्पादक गट यांचे तर्फे शेतकरी ते ग्राहक थेट (Door to door) विक्री व्यवस्थेचा उपक्रम सुरू केला.

करोना प्रादूभावाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व दळणवळण व्यवस्थेवर आलेल्या मर्यादा लक्षात घेता शेतमाल अंतिम ग्राहकापर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या. दूसरीकडे भाजीपाला नाशवंत असल्याने तो सडून शेतकरी वर्गाचे आतोनात नूकसान होत असल्याचे चित्र दिसत होते. परंतु या उपक्रमाने वरील सर्व समस्या सुटण्यास मदत होईल असे मत उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी व्यक्त केले.

या उपक्रमा अंतर्गत एका कुटुंबीयांस साधारण आठवडाभर पुरेल एवढा विविध प्रकारचा भाजीपाला कापडी पिशवीत भरून फॅमिली पॅक तयार करून थेट ग्राहकाच्या दरवाजा पर्यंत पोहोच करण्याची पध्दत अवलंबण्यात आल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराचे बाहेर पडण्याची आवश्यकता राहत नाही, असे उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

भाजीपाल्याच्या खरेदी नंतर पैसे आदान प्रदान करणे करता ऑनलाईन पेमेंट सुविधा जसे की भीम ॲप किंवा पेटीएम प्रणाली द्वारे होणार असल्याने नोंटाची हाताळणी टाळून करोना चा प्रादुर्भाव थांबवण्यास मदत होत आहे.

भाजीपाला बॅगचे विक्री व वितरण करणारे गटाचे प्रतिनिधी हे नेहमी मास्क, सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोज चा वापर करीत आहेत. जेणेकरुन आपली स्वताची व इतरांची सुरक्षा देखील सुनिश्चित केली जाईल.

आज या उपक्रमाचे उद्घाटन संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुधाकर बोराळे उपविभागीय कृषि अधिकारी, अमोल निकम तहसिलदार संगमनेर, बांगर साहेब मुख्याधिकारी, संगमनेर नगरपालिका, प्रशांत शेंडे तालूका कृषि अधिकारी संगमनेर, प्रविण गोसावी तालूका कृषि अधिकारी अकोले, दत्तात्रय झोळेकर, बापूसाहेब गुंजाळ, वसंत फिरोदीया व आँरेज कार्नर परिसरातील ग्राहक व नागरिक उपस्थितीत होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top