Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिककरांच्या सहकार्याने कुंभमेळा यशस्वी होईल

नाशिककरांच्या सहकार्याने कुंभमेळा यशस्वी होईल

सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिकची आध्यात्मिक ओळख आहे. या महापर्वासाठी जगभरातून येणारे भाविक आणि नाशिककरांसाठी सोयीसुविधांचे नियोजन सुरू आहे. भविष्याचा विचार करून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

'धार्मिक परंपरा जपणारे स्वच्छ आणि सुंदर शहर' असा ठसा जागतिक पातळीवर उमटविण्याचा प्रयत्न आहे. ध्वजारोहण ही पवित्र कुंभपर्वाची सुरुवात आहे. नाशिककरांच्या सहकार्याने हे आव्हान यशस्वी होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. मनीषा खत्री यांनी व्यक्त केला.

दर बारा वर्षांनी होणाऱया कुंभमेळ्याचा प्रारंभ 31 ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाने होत आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. कुंभमेळ्याची विकासकामे करण्याची संधी ही ईश्वरकृपा असून, जनतेच्या सहकार्याने हे कार्य पूर्ण होईल, असा विश्वास मनीषा खत्री यांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana