Dailyhunt
नाटे परिसरात अवैध गोवा दारू विक्रीवर ग्रामस्थांची धाड; गोवा बनवटीचा साठा सापडला

नाटे परिसरात अवैध गोवा दारू विक्रीवर ग्रामस्थांची धाड; गोवा बनवटीचा साठा सापडला

सामना 1 week ago

राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात गोवा बनावटीची अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या प्रकारावर अखेर स्थानिक ग्रामस्थांनीच धाड टाकत कारवाई केली. या धाडीत मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाटे परिसरात काही ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.

अखेर संतप्त ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित ठिकाणी धाड टाकली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा साठा सापडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana