Dailyhunt
नेहरू सेंटरमध्ये 'उन्हाळी कार्यशाळा'

नेहरू सेंटरमध्ये 'उन्हाळी कार्यशाळा'

सामना 2 weeks ago

नेहरू सेंटर, वरळीच्या वतीने उन्हाळी कार्यशाळांची पर्वणी मिळणार आहे. 18 ते 23 मे 2026 या सहा दिवसांच्या कालावधीत वरळीच्या नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये विविध कार्यशाळा होतील. त्या क्षेत्रातील अनुभवी मान्यवर या कार्यशाळांचे संचालन करणार आहेत.

यामध्ये पंडित बिरजू महाराज यांच्या शिष्या शाश्वती सेन यांची कथ्थक नृत्यावर आधारित 'कथ्थक दर्पण', पंडित कालिनाथ मिश्रा यांची तबला कार्यशाळा 'लय और ताल', डॉ मिलिंद इनामदार यांची 'अभिनय कार्यशाळा', नंदकुमार पाटील यांची पारंपरिक लावणीवर आधारित 'लावणी माझी सखी' कार्यशाळा तसेच पंडित विश्वनाथ कान्हेरे यांची 'सूर और ताल' ही हार्मोनियम कार्यशाळा यांचा समावेश आहे.

सर्व कार्यशाळा विनामूल्य असल्या तरी त्यात प्रवेश मिळविण्यासाठी काही निकष असतील आणि त्यासाठी सहभागी होणाऱयांची चाचणी परीक्षा घेण्यात येईल. प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी प्रकाश पवार (9820356766) आणि अक्षय भोसले (7208757589) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana