Dailyhunt
नेपाळमध्ये भीषण अपघात, यात्रेकरूंची जीप दरीत कोसळली; 20 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये भीषण अपघात, यात्रेकरूंची जीप दरीत कोसळली; 20 जणांचा मृत्यू

सामना 2 weeks ago

यात्रेकरूंना घेऊन जाणारी जीप 700 फूट खोल दरीत कोसळून 20 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नेपाळमध्ये घडली. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने जीप घसरून दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, थवांग ग्रामीण नगरपालिकेच्या जलजाला परिसरातून डोंगराळ रस्त्यावरून यात्रेकरूंना घेऊन जीप चालली होती. पावसामुळे रस्ते चिखलमय झाल्याने जीप घसरली आणि थेट दरीत कोसळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana