Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
New York: टाइम्स स्क्वेअरजवळ महिलेचा दोघांवर चाकूने हल्ला; १ ठार, पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर महिलाही ठार

New York: टाइम्स स्क्वेअरजवळ महिलेचा दोघांवर चाकूने हल्ला; १ ठार, पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर महिलाही ठार

सामना 6 days ago

मेरिकेतील न्यू यॉर्क शहरातल्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर परिसरात एका महिने दोन जणांवर चाकूने हल्ला केला. न्यू यॉर्क शहर पोलीस विभागाने (NYPD) दिलेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला.

यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ती हल्लेखोर महिलाही ठार झाली.

सोमवारी झालेला हा गोळीबार न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या एका कार्यालयाजवळ, ‘वन टाइम्स स्क्वेअर’ इमारतीबाहेर घडला. याच भागात दरवर्षी न्यू इयरच्या सेलिब्रेशनमध्ये ‘बॉल ड्रॉप’चा कार्यक्रम होतो. हा संपूर्ण न्यू यॉर्कमधला पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ असलेला आणि पोलिसांचा कडक पहारा असलेला भाग आहे.

सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले की, क्वीन्स भागात राहणाऱ्या या ४९ वर्षीय महिलेने एका शॉपिंग बॅगेतून दोन चाकू काढले आणि एका ६८ वर्षांच्या पुरुषाच्या पोटावर वार केले. त्यानंतर लगेचच तिने वळून एका ३२ वर्षांच्या महिलेच्या पोटातही चाकू भोसकला.

या दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तो पुरुष सध्या धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

हे पीडित लोक शहरात आलेले पर्यटक होते की अमेरिकेचे रहिवासी, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये जवळपास ९-१० पोलिसांनी त्या महिलेला घेरले, यावेळी त्या हल्लेखोर महिलेच्या हातात स्वयंपाकघरात वापरण्याचे दोन मोठे चाकू होते.

पोलीस आयुक्त जेसिका टिश यांनी सांगितले की, पोलिसांनी त्या महिलेला चाकू खाली ठेवण्यासाठी काही मिनिटे समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिच्यावर ‘टेझर’चा वापर केला. त्यावर महिलेने चाकू खाली टाकण्यास नकार दिला. तसेच मी तुम्हा दोघांना मारून टाकेन, अशी धमकी दिली.

त्यानंतर दोन पोलिसांनी त्या महिलेवर गोळ्या झाडल्या. ती महिला जमिनीवर पडताना व्हिडीओत दिसते. एका अधिकाऱ्याने तात्काळ पुढे जाऊन तिच्या हातात बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी तिला पालथे करून प्रथमोपचार केले.

ही महिला मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असे देखील टिश यांनी सांगितले.

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचे सुचवणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे टिश यांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्यानुसार, जोपर्यंत नातेवाईकांना अधिकृत माहिती दिली जात नाही, तोपर्यंत पीडितांची नावे जाहीर केली जाणार नाहीत.

एनवायपीडीने ७ व्या ॲव्हेन्यूचा काही भाग बंद केला आणि सामान्य नागरिकांना त्या भागापासून लांब राहण्याचा इशारा दिला. मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी तिथे तपास करत असताना सुरक्षेसाठी पोलिसांनी पिवळी टेप लावून संपूर्ण परिसर सील केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana