Sunday, 09 Aug, 8.13 am सामना

ठळक बातम्या
निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार

आदिवासी संस्कृतीची ओळख, आदिवासीच्या घरांमध्ये वास्तव्य, त्यांच्या जेवणाची लज्जत, साहसी पर्यटन आणि त्यातून आदिवासींना रोजगार असा सर्व मिलाफ साधण्यासाठी राज्याचे निसर्ग पर्यटन लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने दिली.

जगातील आदिवासींचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त राज्य सरकारने आदिवासींच्या उत्कर्षासाठी अनेक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. जंगलात वास्तव्य करताना वनांचे संरक्षण करण्याबरोबरच जैवविविधता जपण्याचे कामही आदिवासी करत आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निसर्ग पर्यटनाच्या योजना आखल्या आहेत.

राज्यात एक कोटी आदिवासी
z राज्यात 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी समाजाची लोकसंख्या ही एक कोटी पाच लाखांच्या आसपास आहे. आदिवासी व पारंपरिक निवासी यांचे हक्क व अधिकारांचे संरक्षण करण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे असे यानिमित्ताने वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

आदिवासींच्या घरात वास्तव्य
z निसर्ग पर्यटनाची सुरुवात मेळघाटातील आमझरी निसर्ग पर्यटन प्रकल्प आणि ठाणे जिह्यातील शहापूरमध्ये वाफा पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून झाली आहे. आमझरीमध्ये होम स्टे हा प्रकल्प सुरू केला आहे. म्हणजे स्थानिक आदिवासींच्या घरातील एका खोलीत पर्यटकांना वास्तव्य करता येते. आदिवासी संस्कृतीची ओळख होते. त्यातून आदिवासींनी रोजगार उपलब्ध होते. या ठिकाणी रोप क्लाइंबिगसारख्या साहसी पर्यटनचा पर्यायही आहे. शहापूरमध्ये वन विभागाच्या जुन्या व पडक्या वसाहतीचे रूपांतर वन विश्रामगृहात केला आहे. अशा प्रकल्पांतून आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो असे ते म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top