देशभरात खळबळ उडवणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणखी दोघांना बेडय़ा ठोकल्या आहेत. पुण्यातील एका कोचिंग क्लासेसमध्ये भौतिकशास्त्राचा प्राध्यापक असलेला तेजस हर्षदकुमार शहा आणि लातूरमधील डॉ. मनोज शिरुरे या दोघांना अटक केली आहे.
या पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत सीबीआयने 13 जणांना अटक केली असून त्यात सर्वाधिक आरोपी महाराष्ट्रातील आहेत.
लातूरमधील डॉ. मनोज शिरुरे याने आरोपी पी.व्ही. कुलकर्णी याच्याकडून रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न मिळवले. त्यानंतर संबंधित प्रश्न तीन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले होते. या विद्यार्थ्यांमध्ये एका आरोपी कोचिंग सेंटरचालकाच्या मुलाचाही समावेश असल्याचे सीबीआयच्या तपासात निषन्न झाले, तर दुसरा आरोपी तेजस हर्षदकुमार शहा हा पुण्यातील 'डॉ. अभंग प्रभू मेडिकल अॅपॅडमी' या कोचिंग संस्थेत भौतिकशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे. त्याने अटकेतील आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून 'नीट'च्या भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवल्याचा आरोप आहे.
49 ठिकाणीछापेमारी; 13 जणांनाअटक
'नीट' पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने देशभरात 49 ठिकाणी छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले. सीबीआयने दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरमध्ये छापे टाकले. या प्रकरणी 13 जणांना अटक केली असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. तपासात रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे प्रश्न परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचे समोर आले आहे.
49 ठिकाणीछापेमारी; 13 जणांनाअटक
'नीट' पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने देशभरात 49 ठिकाणी छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले. सीबीआयने दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरमध्ये छापे टाकले. या प्रकरणी 13 जणांना अटक केली असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. त्यानुसार दरदिवशी नवनवीन खुलासे होत असून प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे सीबीआय कारवाईवरून दिसून आले आहे. तपासात रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे प्रश्न परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सर्वंकष तपास सुरू असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

