‘निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने पश्चिम बंगाल व आसाममधील निवडणूक चोरली आहे’, अशी जोरदार टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी X वरून एक पोस्ट शेअर करत भाजपवर निशाणा साधला.
‘निवडणूक चोरा, संस्था चोरा याशिवाय भाजपकडे काही पर्यायच नाही’, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
”निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने पश्चिम बंगाल व आसाममधील निवडणूक चोरली आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी सहमत आहोत. पश्चिम बंगालमध्ये भाजपने 100 हून अधिक जागा चोरल्या आहेत. आपण हा खेळ मध्य प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र आणि 2024 च्या लोकसभा निवडणूकीतही पाहिला आहे. निवडणूक चोरा, संस्था चोरा याशिवाय भाजपकडे काही पर्यायच नाही”, अशी टीका राहुल गांधी यांनी X वरून केली आहे.

