काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांचा निर्णय हा योग्यच असून चुकीचा नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते.
त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी विविध मुद्दय़ांवर पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार अकाली गेले त्याचं दुःख कुटुंब म्हणून आम्हाला आहे. अजितदादा हे लोकांसाठी अत्यंत सक्रिय होते. विकासकामांत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आदर आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभा केला नाही, असे बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याबाबत शरद पवार म्हणाले.
पवारकुटुंबाचीजबाबदरीमाझ्यावरकुटुंबप्रमुखम्हणूनअसल्यानेबारामतीतनिवडणूकनलढण्याचानिर्णय.
बॅनरवरमाझाफोटोवापरणेचुकीचे
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सभेत बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह शरद पवार यांचाही पह्टो होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, त्यांच्या बॅनरवर एनडीएच्या नेत्यांचे पह्टो असण्यात काही अडचण नाही. कारण ते एनडीएमध्ये आहेत. पण माझा फोटो वापरणे चुकीचे असल्याचे शरद पवार म्हणाले.
विलीनीकरणाच्याचर्चांवरपडदा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा ही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये सुरू होती. मात्र, सध्या आमच्या पक्षात विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. अजितदादांसोबत या संदर्भात पाच-सहा बैठका झाल्या.भविष्यात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते की नाही आज ते सांगता येत नसल्याचे स्पष्ट करत शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाकला.

