Dailyhunt
ओडिशात चकमक, 70 पोलीस जखमी

ओडिशात चकमक, 70 पोलीस जखमी

सामना 2 weeks ago

डिशाच्या रायगडा जिह्यात एक रस्ता बनवण्याच्या वादावरून आदिवासी आणि पोलीस यांच्यात तुफान राडा झाला. पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत 58 पोलीस कर्मचाऱयांसह एपूण 70 जण जखमी झाले आहेत. 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शागाबारी गावाजवळील सिजीमाली बॉक्सइट खदानीपर्यंत रस्ता बनवला जात होता याला स्थानिक आदिवासींनी विरोध दर्शवला. पोलिसांनी शांत राहण्याची सूचना करताच या ठिकाणी हिंसाचार उसळला. स्थानिकांनी दगडफेक, पुऱहाडी आणि लाठीकाठीने हल्ला चढवला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana