शॉपिंग म्हटलं की धावपळ आणि दगदग आलीच. यामुळे हल्ली सगळ्यांचाच कल ऑनलाईन शॉपिंगकडे वाढत आहे. पण आरामदायी व वेळ वाचवणाऱ्या या ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूकही होते असं नुकतंच समोर आलं आहे.
बंगळुरू येथे राहणाऱ्या रजनीकांत कुशवाहा नावाच्या तरुणाने फ्लिपकार्ट या संकेतस्थळावरून iPhone 11 Pro ऑर्डर केला होता.
दरम्यान, रजनीकांत यांनी याबाबत तक्रार केली असता कंपनीने या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. कंपनीने त्यांना लवकरच नवीन डिव्हाइस देणार असल्याचे सांगितलं आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये अशा प्रकरच्या फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे अनेक लोक ऑनलाईन शपिंग करायला घाबरतात.

