Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा; वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांचा संघात समावेश

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा; वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या मुलांचा संघात समावेश

सामना 1 week ago

स्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा केली आहे. पुरुष निवड समितीने तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी स्वतंत्र संघ जाहीर केले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग, आणि राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड यांचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी या घोषणेला दुजोरा दिला. सेहवाग आणि द्रविड यांसारख्या दिग्गजांच्या मुलांचा संघात समावेश झाल्याने तरुण क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संघ आता ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध दमदार कामगिरीसाठी तयार आहे.

एकदिवसीय सामन्यांसाठी लक्ष्य रायचंदानीला कर्णधार म्हणून आणि यशवर्धन चौहानला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बहुदिवसीय सामन्यांसाठी यशवर्धन चौहान कर्णधार असेल आणि लक्ष्य रायचंदानी उपकर्णधार असेल.

तिन्ही एकदिवसीय सामने आणि पहिला बहुदिवसीय सामना राजकोटमध्ये खेळवला जाईल, तर दुसरा बहुदिवसीय सामना अहमदाबाद येथील ‘बी’ मैदानावर आयोजित केला जाईल.

संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक
१८ सप्टेंबर, २०२६ (शुक्रवार): पहिला एकदिवसीय सामना, राजकोट, सकाळी ९ वाजता
२१ सप्टेंबर, २०२६ (सोमवार): दुसरा एकदिवसीय सामना, राजकोट, सकाळी ९ वाजता
२३ सप्टेंबर, २०२६ (बुधवार): तिसरा एकदिवसीय सामना, राजकोट, सकाळी ९ वाजता

२७ ते ३० सप्टेंबर, २०२६ - पहिला बहुदिवसीय सामना, राजकोट, सकाळी ९:३० वाजता
५ ते ८ ऑक्टोबर, २०२६ - दुसरा बहुदिवसीय सामना, अहमदाबाद बी मैदान, सकाळी ९:३० वाजता

आर्यवीर सेहवागचा पहिल्यांदाच टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर, सप्टेंबरमध्ये राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी निवडला गेला आहे. फलंदाज आर्यवीर नुकताच दिल्ली प्रीमियर लीग २०२६ मध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळला, जिथे त्याची आक्रमक शैली आणि मोठे फटके पाहून त्याचे वडील, वीरेंद्र सेहवाग यांची आठवण झाली. मात्र, ही ओळख आर्यवीरसाठी नवीन नाही.

यष्टीरक्षक अन्वय द्रविडचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. जुलैमध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या श्रीलंका दौऱ्यात त्याने ८७ धावांची शानदार खेळी केली होती आणि तेव्हापासून त्याने संघात आपले स्थान कायम राखले आहे.

मात्र, दोन बहुदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या १९ वर्षांखालील संघात आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड या दोघांचाही समावेश नव्हता. याचा अर्थ असा की दोन्ही युवा खेळाडूंना केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्येच स्थान दिले जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana