Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राची हानी! उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राची हानी! उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

सामना 1 week ago

काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले आहे. मंगळवारी कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते.

‘डी. वाय. पाटील हे नाव नव्हते तर महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारी संस्था होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राची हानी झाली आहे’, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

डी. वाय. पाटील हे नाव नव्हते तर महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारी संस्था होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राची हानी झाली आहे. काँग्रेस विचारसरणीचा निष्ठावंत शिलेदार म्हणून ते ओळखले जात. ते सुरुवातीला विधिमंडळात होते. पुढे शिक्षण क्षेत्रात त्यांनी भव्य संस्थात्मक कार्य केले. त्रिपुरा, बिहार सारख्या राज्यात राज्यपाल म्हणून काम पाहिले. शिवसेनाच्या कार्याबाबत त्यांना आस्था होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध होतेच. त्यामुळे ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह अखेरपर्यंत राहिला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने आपला सुपुत्र गमावला’, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि ठाकरे परिवारातर्फे भावना व्यक्त केल्या.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana