Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकड्यांचा रडीचा डाव, अभिनंदनचा पुतळा ठेवला कैदी स्वरुपात

पाकड्यांचा रडीचा डाव, अभिनंदनचा पुतळा ठेवला कैदी स्वरुपात

सामना 6 years ago

विंग कमांडर अभिनंदन याने पाकिस्तानचे विमान पाडले होते. त्यानंतर तो चुकून पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. वॉर्सा करारानुसार पाकिस्तानला अभिनंदला हिंदुस्थानच्या हवाली करावे लागले. ही बाब त्यांना चांगलीच झोंबली होती. म्हणून त्यांनी आता आपल्या म्युझियममध्ये अभिनंदनचा पुतळा कैदी स्वरुपात ठेवला आहे.

कुपवाड्यात हिंदुस्थानच्या जवानांवर मोठा हल्ला झाला होता. त्यात हिंदुस्थानचे 44 जवान शहीद झाले होते. त्यानंतर हिंदुस्थानने बालाकोटवर एअरस्ट्राईक करून दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. नंतर दोन्ही देशात चांगलाच तणाव वाढला होता. नंतरच्या कारवाईत हिंदुस्थानने पाकिस्तानचे एक विमान पाडले. या कारवाईत हिंदुस्थानी वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदर पाकिस्तनाच्या तावडीत सापडले. हिंदुस्थानने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणला. त्यामुळे पाकिस्तानला वॉर्सा करारानुसार युध्द सैनिकाला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. म्हणून पाकिस्तानने आता त्यांच्या सैन्याच्या एका संग्रहालयात अभिनंदनचा पुतळा ठेवला आहे. तसेच त्याच्या मागे एक पाकिस्तानी सैनिकाचा पुतळाही दाखवण्यात आला आहे. यातून पाकिस्तान अजून किती चिडला आहे हे दिसून येते.

वर्ल्डकपदरम्यान पाकिस्ताने एक जाहिरात बनवली होती. त्यात अभिनंदन सारखी एक व्यक्तिरेखा दाखवून हिंदुस्थानला हिणवण्यात आले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana