Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पालिकेतील 26 कामगार-कर्मचारी संघटनांचा 'महासंघ'

पालिकेतील 26 कामगार-कर्मचारी संघटनांचा 'महासंघ'

सामना 1 week ago

मुंबई महापालिकेतील 26 कामगार- कर्मचारी संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी पालिकेतील कंत्राटीकरण रोखण्यासाठी 'मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ' म्हणून एकत्र येऊन लढा देण्याचे ठरवले आहे.

मोटर लोडरचे खासगीकरण, जुनी पेन्शन योजना अशा अनेक विषयांवर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी महासंघ कायदेशीर प्रयत्न करणार आहे. 'मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ'मध्ये म्युनिसिपल कर्मचारी सेनाही सहभागी झाली आहे. मोटर लोडर खासगीकरणाला विरोध, कर्मचाऱ्यांच्या अर्धवेतनी रजेच्या 960 कोटींची रखडपट्टी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी आणि कालबद्ध पदोन्नतीच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर मार्गाने महासंघ लढा देणार असे म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana