Thursday, 29 Oct, 12.51 pm सामना

देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

केशुभाई पटेल यांनी दोनवेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भुषवले होते, तसेच 30 सप्टेंबर रोजी सोमनाथ मंदिर विश्वस्तपदी त्यांची दुसर्‍यांदा निवड झाली होती.

दोनवळी मुख्यमंत्रीपद पण कार्यकाल अपूर्ण

केशुभाई पटेल दोन वेळा गुजरात राज्याचे मुख्यामंत्री झाले होते, पण दोन्हीवेळेला त्यांना आपला पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करता आला नाही. 2001 साली त्यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मोदी केशुभाई पटेल यांना आपले राजकीय गुरू मानतात.

राजकीय कारकीर्द

1960 च्या दशकात केशुभाई पटेल यांनी जनसंघ पक्षातून कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले होते. पटेल हे जनसंघाचे संस्थापक सदस्य होते. 1975 साली गुजरातमध्ये जनसंघ आणि काँग्रेस(ओ) यांची युती होऊन राज्यात सत्तास्थापन झाले होते, त्यात पटेल यांची भुमिका महत्त्वाची होती. 1977 साली पटेल लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत गेले होते. नंतर राजीनामा देऊन त्यांनी बाबूभाई पटेल यांच्या जनता आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्रिपद भुषवले होते.

केशुभाई पटेल यांनी 1978 ते 1995 दरम्यान कलावाड, गोंडल आणि विशावादार विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. 1980 साली भाजपची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाने मोठी जवाबदारी सोपवली होती. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला घवघवीत यश मिळाले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top