परभणीत उष्माघातामुळे एक 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाचे नाव माणिकराव वैद्य असून तो दिवसभर उन्हात शेतात काम करत होता.
झरी तालुक्यातील येथील प्रसिध्द हॉटेल चक्रधऱचे मालक माणिकराव दादाराव वैद्य (25) यांचा मंगळवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उष्णाघातामुळे मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने माणिकराव वैद्य सकाळी शेतावर गेले होते. शेतात ते पर्हाट्या वेचण्याचे काम करत होते. मंगळवारी या परिसरात उष्णतेची लाट उसळल्याने काम थांबून ते दुपारचे जेवण केल्यानंतर पुन्हा कामास लागले होते.

