Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पश्चिम बंगालमधील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था धक्कादायक; मेहबूबा मुफ्ती यांची टीका

पश्चिम बंगालमधील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था धक्कादायक; मेहबूबा मुफ्ती यांची टीका

सामना 4 months ago

भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत धक्कादायक झाली असल्याचे पीपल डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी म्हटले आहे.

PTI ने याबाबत वृत्त दिले आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदारअभिषेक बॅनर्जी यांच्यावर जमावाने केलेल्या हल्ल्यावर मेहबूबा मुफ्ती यांनी X वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे. “भाजपने पश्चिम बंगाल निवडणूक जिंकल्यापासून तिथली कायदा आणि सुव्यवस्था सातत्याने ढासळत चालली आहे, जी खरोखरच धक्कादायक आहे. तिथे पोलिसांसारख्या निष्पक्ष संस्थांचा वापर आता राजकीय हत्यारासारखा केला जात असून, अभिषेक बॅनर्जी यांच्यासारख्या राजकीय विरोधकांवर जीवघेणे हल्ले घडवून आणले जात असताना पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत,” असे मुफ्ती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील जनतेने ज्या बदलासाठी मतदान केले होते, तो बदल नक्कीच असा नव्हता. पश्चिम बंगालच्या जनतेने याच बदलासाठी मतदान केले होते का? नक्कीच नाही,” असेही त्या म्हणाल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana