Friday, 30 Aug, 9.14 am सामना

ठळक बातम्या
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे विवाहितेचा पती, सासू व ननंद यांनी छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण केली आणि तिचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर कोपरगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेचा पती मयुर शशिकांत नार्इक व सासू लता शशिकांत नार्इक यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुजा मयुर नार्इक ( वय 20) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी मृत पुजाचे वडील अरुण उर्फ बाळासाहेब भास्कर निसाळ ( वय 59, रा. खडकपुरा सिन्नर) यांनी पती मयुर शशिकांत नार्इक, सासू लता शशिकांत नार्इक व नणंद प्रिती रविंद्र जोशी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले की, त्यांची मुलगी पुजाला महिन्याभरापासून तिचा पती मयर,सासू लता नणंद प्रिती वेळोवेळी स्वयंपाक व घरगुती कामावरुन टोमणे मारत होते. चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून 29 ऑगस्टला सकाळी ११ वाजता तिने ब्राम्हणगांव येथे सासरच्या घराजवळील कांद्याचे चाळीमध्ये दोरीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. पुजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर कोपरगांव ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक आशिष शेळके पुढील तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>