Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पायधुनी मृत्यू प्रकरण, चौघांच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम

पायधुनी मृत्यू प्रकरण, चौघांच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम

सामना 2 weeks ago

पायधुनी येथे मटण बिर्याणी आणि कलिंगड खाऊन झोपलेल्या दोकाडिया कुटुंबातील चौघांचा उलटय़ा व जुलाबाच्या त्रासाने मृत्यू झाला. पोलिसांच्या हाती या प्रकरणाशी संबंधित मायक्रोबायोलॉजी अहवाल आला असला तरी त्यातूनही चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

यामुळे या प्रकरणाचे गूढ कायम आहे.

हिस्टोपॅथॉलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी या अहवालावर या चौघांचा मृत्यूचे कारण काय ते स्पष्ट होणार होते. पैकी मायक्रोबायोलॉजी अहवाल प्राप्त झाला असून त्यातून काही स्पष्ट होत नसल्याचे सांगण्यात येते. हिस्टोपॅथॉलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी अहवाल अद्याप प्रलंबित असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी हे अहवाल महत्त्वाचे ठरणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana