Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फेसबुक मैत्रिणीचा लोच्या; बँक खाते केले साफ, ६ लाख २१ हजार लांबवले

फेसबुक मैत्रिणीचा लोच्या; बँक खाते केले साफ, ६ लाख २१ हजार लांबवले

सामना 1 week ago

फेसबुकवरील मैत्री एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मैत्रिणीने तरुणाच्या बँक खात्यातून ६ लाख २१ हजार रुपये काढून संपूर्ण खाते साफ केले.

याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात दोन सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा रोड येथील पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये राहणारे अजित मोहिते (३७) हे खाजगी कंपनीत काम करतात. त्यांच्या फेसबुक खात्यावर अनन्या अग्रवाल नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यानंतर अनन्याने अजित यांना तिचा व्हॉट्सॲप क्रमांक दिला. संवाद वाढल्यानंतर अनन्याने ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे मोठा आर्थिक नफ्याचे आमिष दाखवले. तिने व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले आणि त्याद्वारे युएसडीटी खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अजित यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने ६ लाख २१ हजार ९०० रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ॲनिस म्यॅथ्युज आणि अनन्या अग्रवाल या दोघांविरोधात तक्रार दाखल केली.

गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवून लुटले

महानगर गॅसचे कनेक्शन कापण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी महिलेचे सहा लाख रुपये लुटल्याचा प्रकार मीरा रोडमध्ये घडला आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नफिसाबेन शेरवा एका व्यक्तीने महानगर गॅस कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगितले. गॅस मीटर अपडेट करण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवून बँक खात्यातून सायबर भामट्यांनी ५ लाख ९९ हजार रुपये काढून घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana