नवी मुंबईत फ्लेमिंगोंचे घर म्हणून ओळख असलेले एनआरआय आणि टी. एस. चाणक्य परिसरातील तलाव या पाणथळ जागा नाहीत, असा निर्णय ठाणे जिल्हास्तरीय पाणथळ समितीने दिला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी असलेल्या तलावांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने फ्लेमिंगो येतात.
या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी नागरिकांची याच ठिकाणी मोठी गर्दी होते. पाणथळ समितीने दिलेल्या या निर्णयामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पाणथळ सनियंत्रण समितीने एनआरआय परिसरातील फ्लेमिंगो पॉइंट, टी. एस. चाणक्य जल साठा, लोटस तलाव, ज्वेल ऑफ नवी मुंबई यासह आठ ठिकाणांचा अभ्यास करून त्यांना ‘पाणथळ नियम २०१७’ अंतर्गत अपात्र ठरवले आहे.
मानवनिर्मित स्वरूप, पूर्वीचा वापर आणि विकास आराखड्यातील आरक्षण ही कारणे यासाठी पुढे करण्यात आली आहेत. मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी २०२४ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली राज्याच्या पर्यावरण विभागाकडून
जिल्हास्तरीय समितीचा अजब निर्णय पामबीच रोडलगत टी. एस. चाणक्यजवळील तलाव कचरा टाकणे आणि ऱ्हासामुळे धोक्यात असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. मात्र ठाणे जिल्हा वेटलैंड समितीच्या एप्रिल २०२६ च्या बैठकीच्या इतिवृत्तात या निरीक्षणांचा तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणाचा उल्लेखच नाही.
लोटस लेकला पूर्वी भातशेती, नंतर विकासासाठी हस्तांतरण केल्याने आणि ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ तलाव हा कृत्रिम पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असल्याने वेटलैंड नाही, असा दावा ठाणे जिल्हा वेटलैंड समितीने केला आहे. यासह घणसोली आणि गोठीवली तलावाचा दर्जासुद्धा नाकारला आहे.
मागवलेल्या माहितीनुसार ७ ते २१ मार्च २०२४ दरम्यान केंद्र सरकार नियुक्त ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात याच जलसाठ्यांची पर्यावरणवाद्यांशी चर्चा न करता समितीने परस्पर हा निर्णय घेतल आहे. हा प्रकार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करणारा आहे. समितीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे, अशी प्रतिक्रिया सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटचे संचालक सुनील अग्रवाल यांनी दिली आहे.
‘पाणथळ’ म्हणून अधिकृत नोंद करण्यात आली असून, संबंधीत ठिकाणांचे अक्षांश-रेखांशही नमूद करण्यात आले असताना जिल्हा समितीने या नोंदींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

