Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत तिरंगा आंदोलन

Photo - आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत तिरंगा आंदोलन

सामना 1 day ago

मुंबईतील मैदाने आणि भूखंड वाचवण्यासाठी वांद्र्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जोरदार तिरंगा आंदोलन करण्यात आले. वांद्रे रंगशारदा येथील नेव्हील डिसोझा फुटबॉल ग्राऊंड येथे झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळे भूखंड ढापण्याच्या सरकारच्या वृत्तीचा निषेध केला.

आंदोलनात भूखंड ढापाढापीचा निषेध करून भाजपला 'रेड कार्ड' दाखवण्यात आले. मुंबईतील मोकळे भूखंड बिल्डर-कंत्राटदार मित्रांच्या घशात घालण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने मुंबईकर, खेळाडू, शिवसैनिक उपस्थित होते.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana