Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - चिंब पावसानं रानं झालं आबादानी

Photo - चिंब पावसानं रानं झालं आबादानी

सामना 1 week ago

डोंगर-दऱ्यांतून फुललेली हिरवाई… वाऱ्याच्या मंद झुळकीने हलकेच हेलकवणारी गवताची लुसलुशीत पोपटी पाती… निळ्याशार आकाशात दाटणारे ढग…. अन् या ढगांआडून अवचितच डोकावणारी सूर्याची किरणे… तर कधी चिंब-चिंब करणाऱ्या अवखळ सरींचा रंगणारा खेळ!

तन-मनाला चैतन्याची साद घालणारा पानशेत-वरसगाव धरणपरिसरातील हा निसर्गाविष्कार टिपला आहे चंद्रकांत पालकर यांनी. या निसर्गाविष्काराबरोबरच परिसरात सुरू असलेली भातलावणीची लगबग नजरेतून सुटली तर नवलच!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana