Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - नॅशनल क्रशचा क्लासिक फॅशन जलवा! रश्मिकाच्या सुंदर वेलव्हेट आऊटफीटने वेधले लक्ष

Photo - नॅशनल क्रशचा क्लासिक फॅशन जलवा! रश्मिकाच्या सुंदर वेलव्हेट आऊटफीटने वेधले लक्ष

सामना 1 week ago

पल्या दिलखेचक हास्य आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ही दाक्षिणात्य सुंदरी केवळ अभिनयातच नाही, तर फॅशनमध्येही आघाडीवर आहे.

नुकतेच एक फोटोशूट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदानाने एक अत्यंत सुंदर आणि रॉयल वेलव्हेट अनारकली सूट परिधान केला आहे. या अनारकलीच्या वरच्या भागावर आणि बाह्यांवर भरगच्च पारंपरिक झरी, एम्ब्रॉयडरी आणि टिकलीचे काम केले आहे. घेराच्या खालच्या बॉर्डरवरही मॅचिंग झरी बॉर्डर दिलेली आहे. सोबत गडद हिरव्या रंगाचा वेलव्हेट दुप्पटा आहे, ज्याच्या बॉर्डरवर हेव्ही एम्ब्रॉयडरी आणि संपूर्ण दुपट्ट्यावर नक्षीकाम केले आहे. या लुकला शोभेल असा हेव्ही चोकर नेकलेस आणि हातामध्ये कडे घातले आहे. त्यासोबत रश्मिकाने केस मोकळे ठेवले असून मिनिमल, ग्लॅम मेकअपसह नॅचरल लुक ठेवला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana