राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल पंपांवर नागरिकांनी इंधन खरेदीसाठी प्रचंड गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा करून ठेवण्यासाठी अनेक नागरिक हातात कॅन, ड्रम आणि बाटल्या घेऊन पंपांवर धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली असून, पेट्रोल पंपांवर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता नागरिक तासन्तास रांगेत उभे राहून इंधन भरत आहेत.

