Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

Photo - संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

सामना 2 days ago

वारकऱ्यांना आषाढी एकादशीचे वेध लागलेले दिसून येत असून अनेक दिंड्या आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत.

संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी बुधवारी बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे. पुढील चार दिवस या पालखीचा मुक्काम बीड जिल्ह्यात असणार आहे.

बीड जिल्ह्याच्या वेशीवरच मोठ्या संख्येने भाविकांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले आणि मनोभावे दर्शन घेतले यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला.

संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या दिंडीचे यंदाचे 57 वे वर्ष असून या दिंडीमध्ये 700 वारकऱ्यांनी सहभाग घेतलाय.

दिंडीचा आजचा मुक्काम शक्तीकुंज वसाहत येथे असणार आहे. तर गुरुवारी ज्योतिर्लिंग वैजनाथच्या नगरीत पालखी दाखल होईल. त्यानंतर अंबाजोगाई आणि बोरीसावरगाव या गावात देखील पालखीचा मुक्काम असेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana