Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - सिंहस्थ धर्मध्वज, ध्वजस्तंभातून कुंभमेळा परंपरेचे दर्शन; जाणून घ्या अर्थ

Photo - सिंहस्थ धर्मध्वज, ध्वजस्तंभातून कुंभमेळा परंपरेचे दर्शन; जाणून घ्या अर्थ

सामना 17 hrs ago

1 / 6

 त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावरील भगव्या ध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, दोन राशी व बृहस्पतीच्या भ्रमणचक्राचे प्रतिक १२ घंटा, गोदावरी नदीचे वाहन मगर, ॐ, स्वस्तिक, र्‍हीं, दशदिशा आहेत.

 मुख्य धर्मध्वज साडेपंधरा फूट लांबी व साडेपाच फूट उंचीचा आहे. एका बाजूस बृहस्पतीचे वाहन सिंह, काळाचे प्रतीक सूर्य-चंद्र, दुसर्‍या बाजूस अमृत कलश, ॐ व श्री: साकारलेले आहे. बारा राशी-बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून १२ रेशीम गोंडे; अंतर्नाद व ब्रह्मनादाचे प्रतीक पंधरा घंटा, तीन घुंगरू आहेत. नाशिकच्या श्रीरामकुंड येथे कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा व गोदावरी महाआरतीसाठी भव्य व्यासपीठांची उभारणी सुरू आहे. (छाया : भूषण पाटील)  सलग दुसर्‍या दिवशी गुरुवारी श्रीरामकुंड परिसरात शहर पोलिसांची रंगीत तालीम पार पडली. (छाया : भूषण पाटील)  पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ध्वजारोहण, धर्मध्वज नगरप्रदक्षिणा या सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त, वाहतूक नियोजन, गर्दी व्यवस्थापनाचा आढावा घेतला. (छाया : भूषण पाटील)  गोदाघाटावरील मंदिरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. (छाया : भूषण पाटील)

सिंहस्थ धर्मध्वज, ध्वजस्तंभातून कुंभमेळा परंपरेचे दर्शन; जाणून घ्या अर्थ

सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबरला होत आहे. नाशिकच्या श्रीरामकुंड येथे दोन, तर त्र्यंबकेश्वरच्या तीर्थराज कुशावर्त कुंडावर एक व गोदाघाटावर एक असे एकूण चार ३१ व ५१ फूट उंचीचे ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहेत. समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या चौदा रत्नांचे आकर्षक कोरीव काम त्यावर करण्यात आले आहे. प्रखर वैराग्याचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजांवरील वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम कुंभमेळ्याचे पौराणिक महत्त्व अधोरेखित करते.

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या ५१ फूट उंचीच्या मुख्य ध्वजस्तंभावर अमृत कलश धरलेला गरूड, समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या १४ रत्नांची प्रतीके साकारण्यात आली आहेत. पुरोहित संघाच्या ३१ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर गोदावरी नदीचे वाहन मगर आहे. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावरील ३१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ समुद्रमंथन संकल्पनेवर आधारित आहे. कुशावर्त व गोदाघाट येथील ध्वजस्तंभ अमृतकुंभाच्या परंपरेचे दर्शन घडवतात.

धर्मध्वजावरील शुभचिन्हे

नाशिक येथील दोन्ही भगवे ध्वज बृहस्पतीच्या आकाराचे प्रतीक म्हणून आयताकृती आहेत. मुख्य धर्मध्वज साडेपंधरा फूट लांबी व साडेपाच फूट उंचीचा आहे. एका बाजूस बृहस्पतीचे वाहन सिंह, काळाचे प्रतीक सूर्य-चंद्र, दुसर्‍या बाजूस अमृत कलश, ॐ व श्री: साकारलेले आहे. बारा राशी-बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून १२ रेशीम गोंडे; अंतर्नाद व ब्रह्मनादाचे प्रतीक पंधरा घंटा, तीन घुंगरू आहेत. पुरोहित संघाचा धर्मध्वज ९ फूट लांब व ५ फूट उंचीचा आहे. एका बाजूस गोदावरी नदीचे वाहन मगर, सूर्य-चंद्र, दुसर्‍या बाजूस अमृतकलश, ॐ व श्री: आहेत. ९ घंटा, ६ रेशीम गोंडे, ३ घुंगरू आहेत. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावरील भगव्या ध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, दोन राशी व बृहस्पतीच्या भ्रमणचक्राचे प्रतिक १२ घंटा, गोदावरी नदीचे वाहन मगर, ॐ, स्वस्तिक, र्‍हीं, दशदिशा आहेत. नाशिक येथील ध्वजाचे शिवणकाम आणि नक्षीकाम दुर्गेश खैरनार यांनी, तर त्र्यंबकेश्वर येथील ध्वजावरील नक्षीकाम स्मिता कुलकर्णी यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana