Dailyhunt
पी. जे. हिंदू जिमखाना विजयी

पी. जे. हिंदू जिमखाना विजयी

सामना 5 days ago

76व्या सालारजंग आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत मुंबई जिमखाना येथे झालेल्या सामन्यात पी. जे. हिंदू जिमखाना संघाने मुंबई जिमखाना संघावर 67 धाकांनी विजय मिळवला.

मुंबई जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

पी. जे. हिंदू जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 184 धाका केल्या. त्यात सलामीवीर साहील गोडेने 60 धावांचे योगदान दिले. चौथ्या क्रमांकावरील गौतम वाघेलाने 44 धावा त्याला चांगली साथ दिली. मुंबई जिमखान्याकडून ओसामा चौधरी (3/18) आणि आशय सजनानीने (2/36) प्रभावी मारा केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana