Dailyhunt
पीएफ 'यूपीआय'द्वारे थेट खात्यात, लवकरच येतेय ईपीएफओचे नवे अॅप

पीएफ 'यूपीआय'द्वारे थेट खात्यात, लवकरच येतेय ईपीएफओचे नवे अॅप

सामना 2 days ago

केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे 'ईपीएफओ' लवकरच नवीन अॅप लाँच करणार आहे. त्यामुळे पीएफचे पैसे काढणे एकदम सोपे आणि आणखी जलद होणार आहे. या अॅपचे वैशिष्टय़ म्हणजे युजर्स थेट आपल्या बँक खात्यात यूपीआयच्या माध्यमातून पीएफचे पैसे ट्रान्स्फर करू शकतील.

या फीचरची चाचणी पूर्ण झाली असून लवकरच ते वापरात येईल असे समजते.

ईपीएफओचे नवीन अॅप पूर्णपणे डिजिटल आणि युजर फ्रेंडली आहे. युजर्सचे ईपीएफओ अकाऊंट थेट त्याच्या बँक खात्याला लिंक केले जाईल. तसेच ते भीम अॅप किंवा अन्य यूपीआय अॅपसोबत इंटिग्रेटेड असेल.

ईपीएफओ सदस्यांना पीएफच्या एकूण जमा रकमेपैकी केवळ 75 टक्के रक्कम काढता येईल. 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवावी लागेल. जर कर्मचाऱयाची नोकरी गेली की त्याला उर्वरित 25 टक्के 12 महिन्यांनी काढता येईल.

जोपर्यंत ईपीएफओचे नवीन अॅप लाँच होत नाही, तोपर्यंत सदस्य 'उमंग' अॅपच्या माध्यमातून पीएफ क्लेम करू शकतात. अर्थात त्यावर सध्या यूपीआयचा पर्याय नाही. मात्र सदस्य थेट मोबाईलमधून अर्ज करू शकतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana