Dailyhunt
प्लॅटफॉर्मवर 'लाल' लक्ष्मणरेषा आखा, लोकलच्या गर्दीमुळे होणाऱ्या अपघातांवर तोडगा; हायकोर्टाचे रेल्वेला महत्त्वपूर्ण आदेश

प्लॅटफॉर्मवर 'लाल' लक्ष्मणरेषा आखा, लोकलच्या गर्दीमुळे होणाऱ्या अपघातांवर तोडगा; हायकोर्टाचे रेल्वेला महत्त्वपूर्ण आदेश

सामना 5 days ago

लोकलच्या गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्लॅटफॉर्मवर पिवळ्या पट्टय़ांऐवजी लाल रंगाची रेषा आखा. जेणेकरून प्रवासी या लक्ष्मण रेषेच्या पुढे येणार नाहीत, असे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत.

सध्या प्लॅटफॉर्मवर असलेली पिवळ्या रंगाची रेषा पुसट असते. ती प्रवाशांना दिसत नाही. त्यामुळे या रेषेचे उद्दिष्टच साध्य होत नाही. त्यापेक्षा लाल रंगाची रेषा आखायला हवी. लाल रंग प्रवाशांना स्पष्टपणे दिसेल व या रेषेच्या पुढे प्रवासी जाणार नाहीत. या रेषेच्या पुढे प्रवाशांनी येऊ नये याची उद्घोषणा रेल्वेने वारंवार करायला हवी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. लाल रेषेच्या पुढे प्रवासी जाणार नाहीत याची दक्षता पोलिसांनी घ्यायला हवी, असे न्यायालयाने नमूद केले.

जपानी लोकांसारखे वागा

जपानी लोकांना नागरिक कर्तव्याची जाण आहे, अशी जाणीव आपल्यामध्येही रुजू द्या. किमान स्वतःचे हित जपण्यासाठी तरी लोकल प्रवाशांनी नियमांचे पालन करायला हवे. प्लॅटर्फामवरील लाल रेषेच्या पुढे प्रवासी जाणार नाहीत यासाठी रेल्वेने जनजागृती करायला हवी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

g मुंबईच्या लोकलमध्ये बसायला जागाच नसते. सुरुवातीच्या स्थानकातही प्रवाशांना जागा मिळवण्यासाठी उडय़ा माराव्या लागतात, हे वास्तव न्यायालयाने आदेशात अधोरेखित केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana