Thursday, 05 Aug, 7.51 am सामना

ठळक
पोस्टमनची डोंगराएवढी कामगिरी

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या जमान्यात पत्रांचे महत्त्व कमी झाले आहे. मात्र दुर्गम भागात जिथे दळणवळणाची साधनं आजही नाहीत तिथे पोस्टमनवरच अवलंबून रहावे लागते. तामिळनाडूच्या अशाच एका पोस्टमनने साऱयांचे मन जिंकून घेतले आहे. एस. क्रिस्टुराजा असे या 55 वर्षीय पोस्टमनचे नाव आहे. 110 वर्षीय महिलेला पेंशनची रक्कम पोचवण्यासाठी क्रिस्टुराजा दर महिन्यातून एकदा डोंगर चढून जातात.

टायगर रिझर्व्ह क्षेत्रातील आदिवासी वस्तीत पोचेपर्यंत ते साधारण 25 किलोमीटरचा प्रवास पायी करतात. या प्रवासात त्यांचा पूर्ण दिवस जातो. क्रिस्टुराजा सांगतात, मी सकाळी 7 वाजता प्रवासाला सुरुवात करतो. जंगलातच नदीकिनारी न्याहरी करून आदिवासी पाडय़ाजवळील मंदिरापर्यंत जातो. तिथे नदीमध्ये आंघोळ करून मग कुट्टीयाम्मालच्या घरी जातो. कुट्टीयाम्माल यांना पेंशनची रक्कम देऊन सायंकाळी 5 वाजता होडीत बसून परततो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top